New Year 2023: पुणेकरांचा थर्टी फस्ट यंदा जोरात; 'वन डे परमिट'साठी लाखो परवाने

गेल्यावर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणावर परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिले आहेत.
New year
New year

पुणे : यंदा पुण्यातील तळीरामांचा थर्टीफस्ट जोरात होणार आहे. कारण पुणेकरांकडून मद्य प्राशनाच्या 'वन डे परमिट'साठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं लाखोंच्या संख्येनं परवाने वितरित केले आहेत. विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात बियर बार आणि हॉटेलांना १,६५,००० परवान्यांचं वाटप करण्यात आलं आहे. (New Year 2023 Lakhs of applications recieved from Punekar for One Day Permit of liqure)

राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहितीनुसार, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर मद्य परवाने बिअर बार आणि हॉटेल्सना वितरित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात 'वन डे परमिट'साठी १,६५,००० मद्य परवाने देण्यात आले आहेत. या 'वन डे परमिट'ची किंमत पाच रुपये आहे. हे परवाने इच्छुकांना बियर शॉपी किंवा बियर बार, परमिट रुम इथेच मिळणार आहेत.

दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्यपींवर करडी नजर असणार आहे. विनापरवाना मद्यप्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल होऊ शकतो. यासाठी पुणे जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी १० विशेष पथकं या मद्यपींवर नजर ठेवणार आहे. यामध्ये रात्रीच्या गस्ती, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच संशयित गाड्यांची तपासणी होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी ही माहिती दिली.

डिसेंबर महिन्यात अनधिकृत मद्यविक्री संदर्भात २४० गुन्हे दाखल झाले आहेत. तर १७ वाहनं जप्त करण्यात आली आहेत यामध्ये ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com