New Year 2023 : 'दारू नको दूध प्या'; मनसे दारुच्या दुकानाबाहेर दूध वाटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj thackeray
New Year 2023 : 'दारू नको दूध प्या'; मनसे दारुच्या दुकानाबाहेर दूध वाटणार

New Year 2023 : 'दारू नको दूध प्या'; मनसे दारुच्या दुकानाबाहेर दूध वाटणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ३१ डिसेंबरला नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. मनसे कार्यकर्ते दारुच्या दुकानाबाहेर दूध वाटणार आहे.

पुण्यातल्या आठही विभागामध्ये दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. इंग्रजी नववर्षाची सुरुवात दारू न पिता दूध पिऊन का, असा संदेश मनसेच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येईल.

हेही वाचा: New Year Celebration : हँगओव्हर उतरवायचाय? उपाय आहे तुमच्या किचनमध्येच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शाखेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी या उपक्रमाविषयीची माहिती दिली आहे. दरम्यान, पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

पुण्यातला फर्ग्युसन रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता या दोन्ही रस्त्यांवर गाड्यांना प्रवेश बंद असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुणे पोलीस सतर्क झाले आहेत.