नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्यवर्ती पुणे अडकले वाहतुक कोंडीत

प्रत्येकाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदोत्साहात जातो, पुणेकर मात्र त्याला अपवाद ठरले, कारण पुणेकरांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा चक्क वाहतुक कोंडीत अडकण्यासाठीच गेला.
pune traffic
pune trafficsakal
Summary

प्रत्येकाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदोत्साहात जातो, पुणेकर मात्र त्याला अपवाद ठरले, कारण पुणेकरांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा चक्क वाहतुक कोंडीत अडकण्यासाठीच गेला.

पुणे - प्रत्येकाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदोत्साहात जातो, पुणेकर (Pune Citizens) मात्र त्याला अपवाद ठरले, कारण पुणेकरांचा नवीन वर्षाचा (New Year) पहिला दिवस हा चक्क वाहतुक कोंडीत (Taffic) अडकण्यासाठीच गेला. भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद (Transport) करण्याचे ठरविले, त्यानुसार अंमलबजावणी केली आणि वाहनांसह मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरीकांची पुन्हा एकदा "कोंडी' केली, तर मध्यवर्ती भागातील गल्लीबोळांमध्येही वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालकांवर तब्बल दोन-दोन तास वाहतुक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ आली !

नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने नेहमीप्रमाणे भाविकांकडून मध्यवर्ती भागातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातुन भाविकांची गर्दी होते. त्याप्रमाणे शनिवारी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते, हे गृहित धरुन शहर वाहतुक पोलिसांकडून मध्यवर्ती भागातील महत्वाचा छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शनिवारी बंद करण्यात आला. त्याचबरोबर अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) या दरम्यानचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे बाजीराव रस्ता व अन्य रस्त्यांवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली.

pune traffic
आपलं मत: महाराष्ट्रात 'सरकार' कुठंय?; पाहा व्हिडिओ

सकाळी व दुपारी वाहतुक काही प्रमाणात सुरळीत होती. सायंकाळनंतर मात्र वाहतुक पोलिसांकडून स.गो.बर्वे चौक, शनिवारवाडा व जिजामाता चौक येथे बॅरीकेडस्‌ घालून शिवाजी रस्ता रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे मध्यवर्ती भागात जाणाऱ्या वाहनांनी गल्लीबोळातुन केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मार्गे जाण्याचा प्रयत्न केला. त्यातच अप्पा बळवंत चौक व अन्य ठिकाणचेही रस्ते होते. त्यामुळे वाहनचालक वाहतुक कोंडीमध्ये अडकले. विशेषतः वाहनचालकांना बाजीराव रस्त्यावर एक ते दोन तास वाहतुक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ आली. बाजीराव रस्त्यावर महाराणा प्रताप बागेपासून ते शनिवारवाड्यापर्यंत वाहनांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. परगावाहून आलेली अनेक वाहनेही त्यामध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडण्यासाठी बराच वेळ गेला.

बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर

शहरासह परगावांमधून अनेक वाहने शनिवारी मध्यवर्ती भागात आली होती. नागरीकांनी आपली वाहने शनिवारवाड्याभोवती व नदीपात्रामध्येही वाहने लावली होती. बहुतांश वाहने रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे लावल्याने वाहतुक कोंडीमध्ये अधिकच भर पडली. रस्ते बंद असलेल्या, बॅरीकेडस्‌ टाकलेल्या ठिकाणी वाहतुक पोलिस दिसत होते, मात्र वाहतुक कोंडी फोडण्यासाठी कुठेही पोलिसांकडून प्रयत्न होत नसल्याचीही सद्यस्थिती होती.

स्थानिकांसह प्रवाशांचीही गैरसोय

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा स्वारगेट व शिवाजीनगरला जोडण्याचे काम करतो. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पीएमपीएल बस, छोटी वाहने, रिक्षा, दुचाकींची जे-जा सुरू असते. मागील काही महिन्यांपासून वाहतुक शाखेकडून वारंवार शिवाजी रस्ता बंद केला जात आहे. पोलिसांकडून गर्दीचे, वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी थेट रस्ता बंद करण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी स्थानिक नागरीकांवर पोलिसांशी हुज्जत घालण्यात वेळ खर्च होऊ लागला आहे, तर प्रवाशांना जादा पैसे देऊन डेक्कन, टिळक रस्त्याने स्वारगेटपर्यंत पोचण्याची वेळ आली आहे.

"मी शनिवारी दुपारी कोल्हापुरहून निघालो माझ्या चंदननगर येथील घरी कारने जाण्यासाठी निघालो. आम्ही सायंकाळी साडे सहा वाजता टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालय चौकात पोचलो. तेथून महापालिकेपर्यंत येण्यासाठी मला एक ते दिड तास वेळ गेला. कारमध्ये लहान मुले, वृद्ध नागरीक होते. त्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ झाली.'

- शंकर वनारसे, वाहनचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com