Mumbai-Pune Expressway Missing Link
sakal
पुणे - पुणे-मुंबई द्रुतगतीवरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’चे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अत्याधुनिक केबल स्टेड पुलाचा या कामात समावेश आहे. या पुलाच्या दोन टोकांना जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) देण्यात आल्या आहेत.