पानगाव येथे नूतन जि.प.व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान

पानगाव येथे नूतन जि.प.व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान
Published on

PGN26B01348
पानगाव (ता. बार्शी) : येथे नूतन जि.प. व पं.स. सदस्यांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
---
पानगावात नूतन जि.प., पं.स. सदस्यांचा सन्मान
पानगाव : पानगाव (ता. बार्शी) येथे नूतन जि.प. व पं.स. सदस्यांचा ग्रामस्थांतर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या जि.प. व पं.स. निवडणुकीत परिश्रम घेतलेल्या विविध मान्यवरांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत आवारात आयोजित या कार्यक्रमात पानगाव जि.प. सदस्य नंदकुमार काळे, पानगाव पंचायत समिती सदस्य भीमराव गव्हाणे, बावी (आ) पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवसे यांचा यावेळी ग्रामस्थांतर्फे सन्मान करण्यात आला. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आणि नागरिकांचे यावेळी नूतन सदस्यांनी आभार मानत, लोकहिताची कामे वेगाने करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंच जयसिंगराव देशमुख, दयानंद गाडे, अंकुश मोरे, मनोज पाटील, धर्मराज गाडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com