नेवासे बसस्थानकात अस्वच्छता माव्यासह तंबाखूच्या पिचकारीने रंगल्या भिंती; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात.

नेवासे बसस्थानकात अस्वच्छता  माव्यासह तंबाखूच्या पिचकारीने रंगल्या भिंती; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात.
Published on

NWC26A04320
नेवासे : गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या बसस्थानकाच्या भिंती.


पिचकाऱ्यांनी रंगल्या भिंती
नेवासे बसस्थानकातील स्थिती ः प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

मोहन गायकवाड
नेवासे शहर, ता. १७ ः नेवासे बसस्थानकाची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. परिसरात सर्वत्र अस्वच्छता, कचरा, गुटखा तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारल्याने लाल झालेल्या भिंती, बंद पडलेला हिरकणी कक्ष आणि दुर्गंधीचे माहेरघर, अशी नेवासे बसस्थानकाची ओळख सर्वदूर पोहोचली आहे.
एसटी महामंडळाच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक तिकिटामागे २ रुपये स्वच्छता कर आकारण्यात येत आहे. मात्र, त्यातून अद्याप स्वच्छतेची अंमलबजावणी नेवासे बसस्थानकात झालेली दिसून येत नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.
तीर्थक्षेत्र असलेल्या नेवासे बसस्थानकातून दररोज मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी प्रवास करतात. काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून येथे सुसज्ज आसन व्यवस्था उभी करण्यात आली होती. मात्र, आज त्या आसनांवर घुळीचे थर साचले असून, पंखे बंद आहेत. प्रवाशांना नाईलाजाने तेथे थांबून बसची वाट पहावी लागते.
बसस्थानकात परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरू असून, गुटखा, मावा, विक्री होत आहे. तंबाखू खाणाऱ्यांनी जागोजागी थुंकून नेवासे बसस्थानकाला अस्वच्छतेचे आगार बनविले आहे. त्यामुळे आता तर थेट स्वच्छतेसाठी नागरिकांच्या खिशाला २ रुपयांची कात्री लागत आहे. त्यामुळे आता तरी ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे.

ईन्फो--
कक्ष फक्त नावाला
स्तनदा मातांसाठी उभारलेला
हिरकणी कक्षात स्वच्छता नसते, तर कधी कुलूपबंद असतो. प्रवासी महिलांकडून या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महिला व बालकल्याण धोरणाचा नियमांना तिलांजली वाहिली जात आहे.

कोट-
प्रवासी वर्गाकडून २ रुपये स्वच्छता अधिभार घेताय, तर बसस्थानकात स्वच्छता, शुद्ध पाणी, प्रवाशांच्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी, यासाठी आगार व्यवस्थापकांनी लक्ष घालावे.
- अनिल ताके, अध्यक्ष, प्रवासी संघटना, नेवासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com