Wagholi News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू; केसनंद येथील घटना, पतीची पोलिसांकडे लेखी तक्रार

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची घटना केसनंद येथील शाश्वत रुग्णालयात घडला.
Crime

crime

ESakal

Updated on

वाघोली - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची घटना केसनंद येथील शाश्वत रुग्णालयात घडला. या प्रकरणी त्या महिलेचे पती राकेश मोझे यांनी वाघोली पोलिसांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे. ही घटना २१ जून रोजी घडली.

दिपाली राकेश मोझे या प्रसूती दरम्यान सात महिने शाश्वत रुग्णालयात उपचार घेत होत्या. २१ जून रोजी प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर त्यांना पहाटे ५.३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी १० वाजता त्यांची पाण्याची पिशवी फुटून त्यांना खूप वेदना होऊ लागल्या. तेथील डॉक्टरनी त्यांची नैसर्गिक प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. मात्र नैसर्गिक प्रसूती होत नाही हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियन करावे लागेल. असे त्यांच्या पतीला सांगून त्यांच्या सह्या घेतल्या. मात्र सिझेरियनसाठी कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com