लग्नाच्या चौथ्या दिवशीच नवविवाहीतेने घेतला गळफास

लग्नाच्या चौथ्या दिवशीच नवविवाहीतेने घेतला गळफास
Published on: 

लग्नाच्या चौथ्या दिवशीच
विवाहितेने घेतला गळफास

धायटी येथील घटना; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

सांगोला, ता. २४ : तालुक्यातील धायटी येथे रेश्मा रवीद्र पुजारी (वय २२) या नवविवाहितेचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शनिवारी (ता. २४) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रेश्मा हिच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवविवाहितेने आत्महत्या केल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
रेश्मा हिचा विवाह २० ऑक्टोबर २०२६ रोजी धायटी येथील रविंद्र पुजारी याच्याशी झाला होता. शुक्रवारी (ता. २३) पती-पत्नी देवदर्शन करून सायंकाळी घरी परतले होते. रात्री कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर रेश्मा व तिची मावस बहीण घराच्या उजव्या बाजूच्या खोलीत झोपल्या होत्या. कुटुंबातील अन्य सदस्य घराबाहेरील कट्ट्यावर व दुसऱ्या खोलीत झोपले होते. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास रेश्माच्या मावस बहिणीचा रडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी रेश्मा हिने घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिला खाली उतरविल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पती शिवाजी नवनाथ माडेकर याने सांगोला पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक राहुल पांडुरंग देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com