
पुणे : ‘लग्न केलं, पण आता एकत्र राहणं अशक्य झालंय,’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नवविवाहित जोडप्यांकडून दिवसेंदिवस अधिक ऐकू येऊ लागल्या आहेत. विवाहानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांतच जोडप्यांमध्ये वाद सुरू होऊन नातं संपविण्याचा निर्णय घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, कायद्यानुसार लग्न झाल्यानंतर किमान एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे जोडपी ‘हे एक वर्ष कसं पार करावं?’ या चिंतेने त्रस्त आहेत.