महापालिकेत चिखलीचा दबदबा 

अनंत काकडे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

चिखली - महापौरपदासाठी राहुल जाधव यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर आता महापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता यासह क्रीडा सभापती तसेच महिला व बालकल्याण सभापती अशी पाच पदे एकाच वेळी चिखली भागाला मिळाली आहेत. महापालिकेतील निम्म्याहून अधिक पदे एकट्या चिखली भागाला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यापुढील काही काळ तरी महापालिकेच्या राजकारणात चिखली केंद्रबिंदू राहणार हे निश्‍चित आहे. आक्रमक विरोधी पक्षनेता आणि महापौर एकाच गावातील असल्याचे महापालिका सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहावयास मिळेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे. 

महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्तारूढ भाजपकडून महापौरपदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी ताकद पणाला लावत कट्टर समर्थक राहुल जाधव यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. जाधव हे चिखली मोशी प्रभागातून निवडून आले आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने जाधव यांनी निवड निश्‍चित आहे. त्यापूर्वी आक्रमक पद्धतीने सभागृहात बाजू मांडणारे चिखली मोरेवस्ती प्रभागातून निवडून आलेले दत्ता साने यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. तसेच याच प्रभागातील स्वीनल म्हेत्रे या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. त्यांच्या पाठीशी अभ्यासू अशी ख्याती असलेले माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांचा अनुभव आहे, तर नेवाळे वस्ती कृष्णानगर प्रभागातील एकनाथ पवार हे सभागृहनेते आहेत, तर याच प्रभागातील संजय नेवाळे हे क्रीडा समितीचे सभापती आहेत. एवढी पदे एकाच भागात मिळण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. 

Web Title: Next pcmc mayor chikhali