Pune Shirur ST Bus Attack: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बसवर स्कॉर्पिओधारकांचा हल्ला; चालक-वाहकाला मारहाण

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; तिकीटातील रक्कम लुटून दगडफेकीत बसची तोडफोड, प्रवाशांत भीतीचे वातावरण
ST bus stopped, crew assaulted and cash looted at Nhavare.

ST bus stopped, crew assaulted and cash looted at Nhavare.

sakal
Updated on

शिरूर : पुणे - अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे, एसटी बसला स्कॉर्पिओ जीप आडवी लावून चौघांनी चालक - वाहकाला बेदम मारहाण केली. वाहकाकडील सुमारे नऊ हजार रूपयांची रक्कम लुटून नेताना दगडफेक करीत बसची तोडफोड केली. काल (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास बसवरील हल्ल्याच्या या प्रकाराने प्रवाशांमध्येही घबराट पसरली. या थरारक घटनेनंतर विनाक्रमांकाच्या स्कॉर्पिओतून हल्लेखोर पळून गेले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com