

Major MD drug crackdown in Nhavare, Shirur; 56g mephedrone seized, two arrested.
न्हावरे : शिरूर तालुक्यातील वाढत्या एमडी ड्रग्सच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), शिरूर पोलीस आणि न्हावरे पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत तालुक्यातील न्हावरे येथे सुमारे ५६ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त केले. या कारवाईत अंदाजे १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.