
पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी सरकारी नोकरीत समावेशन व विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून (ता. १९) बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये पुण्यातील १४०० कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार असल्याने सरकारी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेसह प्रसूती, नवजात कक्ष, अतिदक्षता विभाग, लसीकरण, औषध, वितरण यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.