

निगडी, ता.१५ ः निगडी प्राधिकरणामधील पेठ क्र.२५, २६ आणि २७ या भागांतील मुख्य व अंतर्गत रस्ते यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी खोदाई केल्याने चिखल, गाळ व काही ठिकाणी खडी रस्त्यांवर आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पेठ क्र.२८ मधील आकुर्डी प्राधिकरण जोडणाऱ्या रस्त्यावर जागोजाग खड्डे पडले आहे. चिखल झाला आहे. त्यामुळे त्याचा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या रस्त्यावर खड्ड्यांची दुरुस्ती करावी यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तरी परंतु रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही. चिंचवड स्टेशन ते आकुर्डी रेल्वे स्थानक जोडणारा लोहमार्गा शेजारील समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदकाम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळे होऊन रस्त्यावर चिखल पसरलेला आहे. ज्या भागात सांडपाणी वाहिनी टाकून झालेली आहे. त्या रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
हरित सेतू प्रकल्पामुळे ही अनेक भागांमध्ये मुख्य रस्त्यांची रुंदी कमी झाल्यामुळे वाहतुकी कोंडीचा सामना करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्राधिकरणात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत असताना रस्त्यांची रुंदी मात्र कमी होत चालली असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्त्यांची रुंदी वाढवण्याची गरज असताना नवीन प्रकल्पातून रस्त्यांची रुंदी दिवसेंदिवस कमी करण्याचा सपाटा लावला असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.