esakal | 'गिफ्ट फ्रॉड' करणाऱ्या नायझेरीयन टोळीला बेड्या; पुणे सायबर पोलिसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

'गिफ्ट फ्रॉड' करणाऱ्या नायझेरीयन टोळीला बेड्या; पुणे सायबर पोलिसांची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - नागरीकांना महागडे गिफ्ट (Gift) पाठविल्याचा बहाणा करून त्यांची फसवणूक (Cheating) करणाऱ्या नायझेरीयन टोळीला (Nigerian Gang) पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे (Cyber Crime) शाखेच्या पोलिसांनी दिल्लीत जाऊन बेड्या ठोकल्या. पोलिसांनी (Police) त्यांच्याकडून 23 मोबाईल, 4 लॅपटॉपसह मोठ्या प्रमाणात साधनसामुग्री व कागदपत्रे जप्त केली. मागील काही दिवसात सायबर पोलिसांनी दिल्लीत केलेली हि तिसरी धडक कारवाई आहे. (Nigerian Gang Involved in Gift Fraud Action of Pune Cyber Police)

जंगो निकोलस ( वय 29), मंडे ओकेके (वय 26) व पॉलिनस मॅबानगो (वय 29, सर्व रा. निलोठी एक्‍सटेंशन, नवी दिल्ली, मुळ रा. लोगास, नायझेरीया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका नामांकीत कंपनीमध्ये खासगी कंपनीमधील उच्च्पदावर काम करणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेशी आरोपींनी फेसबुकद्वारे ओळख वाढविली. त्यानंतर नेटकॉलींगद्वारे महिलेशी संपर्क साधून तिला परदेशातुन सोन्याचे दागिने व परदेशी चलन असे महागडे गिफ्ट पाठविल्याची बतावणी त्यांनी केली होती. संबंधीत गिफ्ट दिल्लीतील विमानतळावरून सोडविण्याचा बहाणा करून, वेगवेगळी कारणे सांगत महिलेकडून तब्बल 4 कोटी रुपये आरोपींनी उकळले होते. महिलेस फसवणूक झाल्याचे लक्षात आले, मात्र आरोपींनी तिची बदनामीची व गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. अखेर फिर्यादीने याबाबत पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांना हा प्रकार सांगितला.

हेही वाचा: पत्नीनेच केला नवऱ्याचा खुन, अन् रचला आत्महत्येचा बनाव

या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या क्‍लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. त्यानुसार सायबर पोलिसांनी दिल्ली येथे जाऊन तीन नायझेरीयन नागरीकांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 23 मोबाईल, चार लॅपटॉप, एक हार्डडिस्क, पाच डोंगल, तीन पेन ड्राईव्ह, आठ मोबाईल सीम कार्ड, तीन डेबिड कार्ड व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. संबंधीत गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामणी व त्यांचे सहकारी दोन आठवड्यापासून दिल्लीत तळ ठोकून होते. त्यानुसार, त्यांच्या पथकाने 3 वेगवेगळ्या गुन्ह्यात 8 आरोपींना अटक केली. हि कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, अंकुश चिंतामणी, संगीता माळी, सहायक निरीक्षक गणेश पवार, उपनिरीक्षक अजुर्न बेंदगुडे, पोलिस कर्मचारी अस्लम आत्तार, संदेश कर्णे, मंगेश नेवसे यांच्या पथकाने केली.

loading image