पुणे : शहरातील कचरा उचलण्यास सकाळचे १०-११ वाजतात. तोपर्यंत अनेक ठिकाणी कचरा पडून शहर घाण होते. सकाळी शहर स्वच्छ असावे म्हणून महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीतूनच उचलण्याचे नियोजन केले. मंगळवारी (ता. ८) रात्रीपासून त्यास सुरुवात झाली..गेले काही महिने यात अडथळे येत होते. आता या कामासाठी १४७२ कर्मचारी आणि २१३ वाहनांचा वापर होत आहे. पहिल्या दिवशी १३६ टन कचरा गोळा करण्यात आला. मंडई, तुळशीबाग, टिंबर मार्केटसह विविध भागांतील खाऊगल्ल्या, महत्त्वाच्या बाजारपेठा या ठिकाणी दिवसा तसेच रात्री उशिराससून रुग्णालयात ५१५ नवजात अर्भकांची जनुकीय विकार तपासणी करण्यात आली असून, वेळीच निदान झाल्यामुळे दोन बाळांना मानसिक व्यंगापासून वाचवता आले. "Sassoon Hospital Screens 515 Newborns for Genetic Disorders Since April"SassoonHospital NewbornCare पर्यंत वर्दळ असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो..अनेक नागरिक रात्रीतून उघड्यावर कचरा टाकून देतात. एकीकडे बेशिस्त नागरिक अन् दुसरीकडे सकाळी कचरा उचलण्यास प्रशासनाला होणारा उशीर, यामुळे शहरात कचरा दिसतो. अशा वेळी सकाळ होण्यापूर्वीच शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगले वातावरण अनुभवता येणे शक्य आहे. त्यामुळे रात्रीतून शहर स्वच्छ करण्याचा मुद्दा पुढे आला. सुमारे एक वर्षापासून घनकचरा विभागातर्फे या मोहिमेचे नियोजन केले जात होते, पण महापालिका आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळत नव्हता. .नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी यांनी नुकतीच शहराच्या विविध भागांत स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी रात्रीतूनच कचरा उचलून शहर स्वच्छ केले पाहिजे, असा आदेश दिला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.आयुक्तांच्या आदेशानंतर उपायुक्त संदीप कदम यांनी परिमंडळ एक ते पाच येथील उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, मुख्य आरोग्य निरीक्षक यांची बैठक घेऊन रात्रीतून कचरा संकलन करण्यासंदर्भात आदेश दिले व कामाचे नियोजन केले..रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत स्वच्छताशहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीचे भाग, ‘व्हीआयपी’ रस्ते, अशा ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत झाडणकाम केले जाईल. गोळा केलेला कचरा उचलण्यासाठी वाहनेही उपलब्ध असतील. क्षेत्रीय कार्यालयांवरील अधिकारी व आरोग्य निरीक्षक यांना या कामावर लक्ष ठेवावे लागेल..क्षेत्रीय कार्यालयनिहायकर्मचारी संख्यानगररस्ता-वडगावशेरी ७०येरवडा-कळस-धानोरी ५४ढोले पाटील रस्ता ८०शिवाजीनगर, घोले रस्ता १०७औंध-बाणेर ११०कोथरूड-बावधन ५०धनकवडी-सहकारनगर १७१सिंहगड रस्ता १४६वारजे-कर्वेनगर ८३हडपसर-मुंढवा १३५कोंढवा-येवलेवाडी ९२वानवडी-रामटेकडी ५०कसबा-विश्रामबाग १५०भवानी पेठ ६८बिबवेवाडी १७६.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.