फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये ‘नाईट स्काय वॉचिंग’ उपक्रम उत्साहात

फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये ‘नाईट स्काय वॉचिंग’ उपक्रम उत्साहात

Published on

SGW26B09401
सांगोला : येथील फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये ‘नाईट स्काय वॉचिंग’ या उपक्रमात सहभागी प्राचार्य सिकंदर पाटील यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक.

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये
‘नाईट स्काय वॉचिंग’ उपक्रम
...........
सांगोला, ता. ४ : विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढविणे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून खगोलशास्त्राची ओळख करून देणे या उद्देशाने फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये ‘नाईट स्काय वॉचिंग’ हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील ३०० हून अधिक विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दुर्बिणीच्या साहायाने चंद्र, ग्रह व विविध तारकासमूहांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. आकाशातील नक्षत्रांची ओळख, ग्रहांची स्थिती आणि विश्वाविषयी रंजक माहिती यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी विशेष उत्सुकता दिसून आली. खगोलतज्ज्ञांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमाविषयी बोलताना प्राचार्य सिकंदर पाटील बोलताना म्हणाले, शाळेमध्ये आयोजित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल. शिवाय भविष्यातही अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात येईल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेच्या आवारात सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात संपूर्ण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी हा अनुभव ‘अविस्मरणीय’ असल्याची प्रतिक्रिया यादरम्यान व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com