Nilesh Ghaywal
sakal
पुणे - कुख्यात नीलेश घायवळ टोळीवर आणखी एक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये(मकोका) कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड परिसरात गोळीबाराच्या घटनेनंतर एका तरुणावर कोयत्याने हल्ला झालेल्या प्रकरणात नीलेश घायवळ, सचिन घायवळसह १७ जणांवर ही कारवाई झाली आहे.