नीलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

नीलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक
Published on

पुणे, ता. २५ : कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील ‘मकोका’ गुन्ह्यातील फरार आरोपी नीलेश ऊर्फ चांग्या हरिशंकर शर्मा याला कोथरूड पोलिसांच्या तपास पथकाने गुरुवारी (ता. २५) अटक केली. तो कोथरूड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांत पोलिसांना गुंगारा देत होता.
कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण आणि त्यांचे तपास पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी चांग्या शर्मा हा सुतार रुग्णालय परिसरातील मंडई भागात दबा धरून बसल्याची माहिती पोलिस अंमलदार विष्णू राठोड, आकाश वाल्मीकी आणि वैभव शितकाल यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर संघटित गुन्हेगारी, बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगणे आणि ‘मकोका’ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल एका खून प्रकरणातही त्याचा शोध सुरू होता. कोथरूड विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com