

शिरूर पोलीस ठाण्याचे आवार की हाणामारीचा अड्डा? पोलिसांच्या डोळ्यादेखत दोन गट भिडले; कायदा-सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे!
Sakal
शिरूर : शिरूर पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गट एकमेकांना भिडल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज (ता. १८) कौटुंबिक वादातून पोलिस ठाण्यासमोर पुन्हा राडा झाला. यात अर्वाच्च्य शिवीगाळ, आरडाओरड्यासह जमावातील स्त्री - पुरूषांची एकमेकांना मारहाणीपर्यंत मजल गेल्याने तणाव पसरला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर गोंधळ थांबला परंतू पोलिस ठाण्याच्या दारातच झालेल्या मारामारीच्या प्रकाराने पोलिसांचा धाक उरला नाही का, असा सवाल प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केला.