Banana Cultivation
sakal
दावडी - खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून सहा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे सुमारे १२ एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. टिश्यू कल्चर पद्धतीने केलेल्या या लागवडीला अवघ्या सात महिन्यांत घड येण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.