

निमगाव केतकी, ता.१३: निमगाव केतकीसह परिसरातील वरकुटे खुर्द, गोतोंडी (ता. इंदापूर) येथे बुधवारी (ता.१३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रचंड वादळी वाऱ्यासह गारांचा झालेल्या पावसात फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वारे व पावसाने नागरिकांची मोठी धांदल उडाली.
निमगाव परिसरात दिवसभर प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण होते. चारच्या सुमारास अचानक वादळ सुरू झाले व त्यानंतर गारांसह पावसास सुरुवात झाली. साधारणपणे २० ते २५ मिनिटात पेरू, डाळिंब, आंबा, शेवगा केळी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
निमगाव केतकीनजीक दत्तनगर येथील माणिक ननवरे म्हणाले की, प्रचंड वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंब्याचे पेरूचे डाळिंबाचे आमचे मोठे नुकसान झाले आहे. निमगाव येथे झाड चार चाकी गाडीवर पडल्याने गाडीचे नुकसान झाले तसेच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत.
गोतोंडी येथील शेतकरी कृष्णा बनकर म्हणाले की, प्रचंड वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या मोडल्या तसेच गारांचा फळांना मार बसल्यामुळे तीन एकरातील १०० ग्रॅम एवढा पेरूच्या फळाला मोठे नुकसान झाले आहे तसेच तीन एकरातील डाळिंबाला देखील गारांचा मार लागल्यामुळे तेलकट डाग येण्याची शक्यता आहे तसेच शेवग्याचा पूर्ण प्लॉट नुकसान झाले आहे.
03273
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.