Leopard Sighting : निमगाव म्हाळुंगी येथे बिबट्याचे वारंवार दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

Leopard Sighting in Nimgaon Mhalungi | शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पाहणी करून पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
Leopard Sighting in Nimgaon Mhalungi

Leopard Sighting in Nimgaon Mhalungi

esakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील कामिनी ओढ्यावरील भागवत वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर बिबट्याच्या दर्शनाचा थरार पाहायला मिळाला. बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील गव्हाणे वस्ती, भागवत वस्ती, गवते वस्ती, मराठे वस्ती, शिंदे वस्ती, पवार वस्ती येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी व दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...