इंदापुरकरांसाठी दिलासा देणारी बातमी; काय ते वाचा सविस्तर

डॉ. संदेश शहा
Sunday, 7 June 2020

इंदापूर शहरात शनिवार (ता. 6 जून) रोजी स्वॅब घेतलेल्या सर्व एकोणीस जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.

इंदापूर : इंदापूर शहरात शनिवार (ता. 6 जून) रोजी स्वॅब घेतलेल्या सर्व एकोणीस जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती तहसिलदार सोनाली मेटकरी व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली. त्यामुळे इंदापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील दर्गा मस्जिद चौकातील रहिवासी  सोलापुरला आपल्या मुलीकडे गेले होते. ते तिथे संचारबंदीमुळे अडकून बसले. त्यानंतर ते इंदापूरला आले मात्र त्यांना थोडा दम लागत असल्याने त्यांना तातडीने पुणे येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांची पहिलीकोविड 19 ही चाचणी निगेटिव्ह आली मात्र दोन दिवसानंतर पुन्हा त्यांची चाचणी केली असता ती पाॅझिटीव्ह आली. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 19 जणांचे विलगीकरण करून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्यांचा निगेटिव्ह अहवाल आला असून, त्यांना आजच घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला शाॅक; `एवढे` झाले नुकसान...

दरम्यान नगराध्यक्षा अंकिताशहा,मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, नगरसेवक पोपट शिंदे, कैलास कदम, पांडुरंग शिंदे यांनी सील केलेल्या क्षेत्रात निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे , शहराध्यक्षा अनिल राऊत यांनी या परिसरातील नागरिकांना कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज रहाण्याचे आवाहन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nineteen people in Indapur tested negative for corona