

एनआयपीएमची पश्चिम विभागीय परिषद उत्साहात
सातारा, ता. १४ ः भविष्यातील विकसित भारताच्या जडणघडणीत तंत्रज्ञानाचा वेग कितीही वाढला, तरी माणूस आणि मानवी मूल्ये हाच विकासाचा मुख्य केंद्रबिंदू असतील, असे मत ‘करारो इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बालाजी गोपालन यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटच्या पश्चिम विभागीय परिषद नुकतीच यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कूपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख नरीमन कूपर यांना एनआयपीएमच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
परिषदेच्या उद्घाटन समारंभास पालकमंत्री शंभूराज देसाई, डॉ. गोपालन, विलो मेदर प्लॅटचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत वाठवे, एसीजी वर्ल्ड लिमिटेडचे ग्रुप सीईओ निखिल कुलकर्णी, एनआयपीएम रत्न डॉ. संतोष भावे, यशस्वी ग्रुपचे विश्वेश कुलकर्णी, यशोदा ग्रुपचे डॉ. अजिंक्य सगरे, निवृत्त मेजर जनरल अमर कृष्णा, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. आर. बसवराजू, अतिरिक्त सरचिटणीस रॉबर्ट कुटिन्हा, कोषाध्यक्ष अमृता करमरकर, डॉ. नरेंद्र पाटील, परिषदेचे संयोजक तथा कूपर कॉर्पोरेशनचे सीएचआरओ डॉ. नितीन देशपांडे, सातारा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उदय भोसले, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य अभय खुरुसाळे आणि उपसंयोजक धैर्यशील देसाई उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या विविध सत्रांमध्ये पारी लिमिटेडचे ग्लोबल सीएचआरओ डॉ. अमित चौधरी, बीओएटी बोर्डाचे डेप्युटी डायरेक्टर श्री. वडोदे, एचपीसीएलचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील सानस, रेनमेटलचे कार्यकारी संचालक विक्रम मस्के, एल ॲण्ड एल प्रॉडक्ट्सचे संचालक (एचआर) लक्ष्मण भोसले, फोसेको इंडियाच्या संचालक (एचआर) प्राची सोनचल, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे जीपीएचआर प्रशांत आंबुळगेकर, यशदाचे प्रकल्प संचालक विश्राम देशपांडे, स्कोडा ऑटोचे ईआर कम्प्लायन्स हेड रामहरी कुटे, रीटर इंडियाच्या उपाध्यक्षा (एचआर) मोनाली रिंघे, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सचे महाव्यवस्थापक (एचआर) डॉ. गौतम भोसले, थर्मॅक्स लिमिटेडच्या ग्रुप एचआर हेड प्राजक्ता जोशी, माइंड वर्क्सचे सीईओ डॉ. संग्रामसिंग पवार आणि टॅलेंट फायंडेक्सचे संस्थापक डॉ. मानस देवान यानी विविध विषयांवर सादरीकरण केले. वहिदा पठाण यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेसाठी महेश खरे, एनआयपीएम सातारा सह्याद्री चॅप्टरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
-------
PNE26W58108
सातारा ः नुकत्याच झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शंभूराज देसाई, डॉ. बालाजी गोपालन, पी. आर. बसवराजू, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. उदय भोसले आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.