इंदापूर - इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 21 जागांसाठी 21 च अर्ज कायम राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
दरम्यान राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्यावरील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवीत सलग 5 वी पंचवार्षिक निवडणुक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे. यंदाच्या संचालक मंडळामध्ये विशेष बाब म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील याही संचालक म्हणून विराजमान झाल्या आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर आज अखेर झालेल्या चारही निवडणुका हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाल्या आहेत.
तर पाचव्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 21 जागांसाठी 21 अर्ज कायम राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व त्यांना सहाय्यक म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार गट निहाय खालीलप्रमाणे :
• बावडा गट:- पाटील हर्षवर्धन शहाजीराव पाटील प्रतापराव सर्जेराव, पाटील उमेश अच्युतराव
• पिंपरी गट:- मोहिते प्रकाश शहाजी, बोडके संजय तुळशीराम, विजय दत्तात्रय घोगरे.
• सुरवड गट:- शिर्के महेशकुमार दत्तात्रय, घोगरे दादासो उत्तम, गायकवाड सुभाष किसन
• काटी गट :- पवार लालासो देविदास, जाधव राजकुमार वसंतराव, वाघमोडे विलास रामचंद्र
• रेडणी गट :- बोंद्रे आनंदराव नामदेव, देवकर राजेंद्र व्यंकट, सवासे दत्तू यशवंत
• अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग:- कांबळे राहुल अरुण
• इतर मागास प्रवर्ग:- यादव कृष्णाजी दशरथ
• भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग:- नाईक रामचंद्र नामदेव
• ब वर्ग सभासद प्रवर्ग :- पाटील भाग्यश्री हर्षवर्धन
• महिला राखीव प्रवर्ग:- पोळ संगिता दत्तात्रय, शिंदे कल्पना निवृत्ती
सर्व सभासदांचे आभार : हर्षवर्धन पाटील
नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. तसेच सध्या देशातील व राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण शेतकऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील 46 गावांमधील सभासदांनी व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल सर्व सभासदांचे आभार.
उदयसिंह पाटील यांची माघार...
कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणेसाठी विद्यमान संचालक उदयसिंह पाटील यांनी बावडा गटातून स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय तहसील कार्यालयामध्येच शेवटच्या दोन मिनिटात घेतला. याबाबत उदयसिंह पाटील म्हणाले, सद्या हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणुकीतील अपयशाने राजकीय पदावर नाहीत.
त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होणे हे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिष्ठितेसाठी आवश्यक होते. म्हणून निर्णय घेतल्याचे सांगितले.तर कारखान्याच्या पहिल्याच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उदयसिंह पाटील यांना तज्ञ संचालक म्हणून घेतले जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.