- विलास मादगुडेमहुडे - भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर पाणलोट क्षेत्रात यंदा दमदार पाऊस झाल्याने दोन्ही धरणे ऑगस्टमध्येच तुडुंब भरली आहेत. भाटघर धरणात सोमवारी (ता.९) ९८.६८ टक्के, तर नीरा देवघर धरणात ९९.७९ टक्के असा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे..यामुळे भोरसह पूर्वेकडील इतर तालुक्यात पाण्याचे संकट टळणार असून टंचाईच्या झळा कमी होणार आहेत. शेतीसाठी मुबलक पाणी मिळण्यास फायदेशीर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.भोर तालुक्यात यावर्षी पाऊसाचे प्रमाण चांगले असल्याने गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यापेक्षा यंदा दोन्ही धरणात जास्तीचा पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ९ डिसेंबर रोजी भाटघर धरणात ८२.५३ टक्के तर नीरा देवघर धरणात ८३.७३ पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाटघर व नीरा देवघर धरणात जवळपास १६ टक्के अधिकचा पाणीसाठा शिल्लक आहे..दृष्टिक्षेपात धरणांची स्थिती...गतवर्षी भाटघर २० सप्टेंबर रोजी, तर नीरा देवघर १९ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले होते.डिसेंबर महिना निम्मा संपत आला तरी दोन्ही धरणांतील उपलब्ध पाणीसाठा मागील काही वर्षांच्या तुलनेत अधिक.यंदा भोर तालुक्यासह पूर्वेकडील गावांतील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाहीदोन्ही धरणांमधील शिल्लक पाणी साठ्यामुळे उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होण्याची शक्यता.पावसाळा सुरू होण्याआधी मे आणि जून महिन्यात दोन्ही धरणांनी तळ गाठला होता त्यामुळे यावर्षी तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे भाटघर व नीरा देवघर धरण क्षेत्रातील नागरिकांनी धरणातील विसर्गाबाबत आंदोलनही केली होती. त्यामुळे आता दोन्ही धरणात असलेला उपलब्ध पाणीसाठा पुढील सहा महिन्यांसाठी योग्य नियोजन करून वापरणे आवश्यक आहे.- शंकर खाटपे, वाठार हिमा (ता.भोर).धरणांचा तालुक्यांसाठी होतो उपयोग...भोर, बारामती, इंदापूर, पुरंदर, फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोलाभाटघर धरण११.९१ टीएमसी (साठवण क्षमता) नीरा देवघर२३.७४ टीएमसी (साठवण क्षमता) भाटघरनीरा डावा कालवापुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यातील ६८ हजार ७६७ हेक्टर क्षेत्र लागवडीलायक असून ३७ हजार ०७० हेक्टर सिंचन क्षेत्र आहे६८ हजार ७६७ हेक्टर : लागवडीलायक क्षेत्र३७ हजार ०७० हेक्टर : सिंचन क्षेत्रनीरा उजवा कालवा(खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला)१ लाख ३० हजार ०२७ हेक्टर : लागवडी लायक६५ हजार ५०६ हेक्टर: सिंचन क्षेत्र.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.