
Pune News: पुणे जिल्ह्यातील नीरा खोऱ्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणातील पाणीसाठा केवळ 8 टक्क्यांवर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत असल्याने आणि यंदा उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. यामुळे धरणाचे बुडीत क्षेत्र कोरडे पडत असून, पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे.