नवी सांगवी येथे ‘निर्भय कन्या अभियान’कार्यशाळा उत्साहात

नवी सांगवी येथे ‘निर्भय कन्या अभियान’कार्यशाळा उत्साहात

Published on

पिंपळे गुरव, ता. २१ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बाबुरावजी घोलप महाविद्यालय यांच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. मुलींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. संगीता जगताप होत्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, प्राचार्य डॉ. शैलजा सांगळे, कराटे प्रशिक्षक शुभम भालेराव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
घाडगे यांनी ‘निर्भय कन्या अभियान’ हे ग्रामीण व वंचित घटकांतील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असल्याचे सांगितले. विद्यापीठामार्फत प्रत्येक महाविद्यालयात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. मुलींना कमकुवत न समजता त्यांना समान संधी देणे आवश्यक आहे, जगताप यांनी सांगितले. यंदा महाविद्यालयातील एकूण ११० विद्यार्थिनींनी या अभियानात सहभाग नोंदविला. सांगळे यांनी मुलींना सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आत्मविश्वासाने संकटांना सामोरे जाण्याची शपथ विद्यार्थिनींकडून घेण्यात आली. भालेराव व त्यांच्या टीमने कराटेचे प्रात्यक्षिक सादर करून मुलींना प्रत्यक्ष स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालन डॉ. रमाकांत कसपटे यांनी केले, तर आभार डॉ. शीतल शेकाडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com