

MAO26B04030
मळेगाव (ता. बार्शी) : येथे मुलींचे समुपदेशन करताना निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे व अन्य.
---
मुलींनो, निर्भय होऊन
जीवन जगायला शिका
घाडगे; मित्र विद्यालयात ‘निर्भया’चे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मळेगाव, ता. २३ : शालेय व सामाजिक जीवनात वावरताना मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहून निर्भयपणे जीवन जगायला शिकले पाहिजे. पोलिस प्रशासन आणि निर्भया पथक हे तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी केले.
मळेगाव (ता. बार्शी) येथील मित्र विद्यालयात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विलास मिरगणे होते. यावेळी प्राचार्य विकास बोराडे, पोलिस हवालदार उज्ज्वला निंबाळकर, पोलिस कॉन्स्टेबल नम्रता गटकुळ, हनुमंत पाडुळे, भाऊसाहेब महानवर, आदर्श शिक्षिका हेमांगी सांगडे, गुलाब शेख, विकास ढेंगळे, बार्शी तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष शंकर आगलावे व राजेंद्र बागूल उपस्थित होते.
घाडगे म्हणाले, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक कार्यरत आहे. शाळा, सार्वजनिक ठिकाणे किंवा प्रवासादरम्यान छेडछाड अथवा अन्य अनुचित प्रकारांचा सामना करावा लागल्यास निर्भया पथक, पोलिस किंवा पालकांशी तत्काळ संपर्क साधावा. तसेच ‘गुड टच’ व ‘बॅड टच’ यातील फरक ओळखण्याबरोबरच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पोलिस हवालदार निंबाळकर यांनी विद्यार्थिनींच्या विविध समस्या जाणून घेत त्यांचे समुपदेशन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शंकर आगलावे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.