Nirgudsar Road Potholes
Sakal
निरगुडसर : निरगुडसर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून रस्त्यावरील प्रवास जीवघेणा बनला आहे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याच्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने निरगुडसर गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळसे पाटील आणि ग्रामस्थांनी पडलेल्या खड्डयात शनिवार (ता.०१)रोजी वृक्षारोपण करून प्रशासनाचा जाहीर निषेध केला.