घोरपडी - वानवडी मधील निर्मला रणदिवे यांनी अतिशय मेहनत करून २०२२ मध्ये नवी कोरी रिक्षा घेतली. दोन महिन्यातच वानवडी गावातून त्यांची रिक्षा चोरीला गेली. कमाईचे साधन हरवले वरून बँकेचा हप्तासाठी तगादा यामुळे रणदिवे कुटुंबीय हवालदिल झाले होते. परंतु दोन वर्षांनी त्यांना पोलिसांचा फोन आला, तुमची रिक्षा हरवली होती ती सापडली आहे असे सांगितले.