Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Union Minister Nitin Gadkari advises: आपल्याकडे उपलब्ध असलेली साधणे व तंत्रज्ञानाचा वापर करून उद्यमशीलता वाढवली पाहिजे, असं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी पुण्यात बोलताना केलं.
nitin gadkari in pune

nitin gadkari in pune

esakal

Updated on

Pune Latest News: पुण्याच्या शेजारून रिंगरोड केले जात आहेत, या रिंगरोडच्या शेजारी व्यापार, उद्योगांसाठी जागा आरक्षीत करून ठेवा. शहरातील बाजारपेठ त्या भागात स्थलांतरित झाल्यानंतर पुण्‍यातील वाहतूक कोंडी, प्रदूषणाचा प्रश्‍न कमी होईल. लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकते. मी नागपूरमध्ये हे करून दाखवले आहे, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजूषा नागपुरे यांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com