पुणे - 'शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा असे दोन चौपदरी भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकल्पासाठी सर्वंकष विकास आराखडा (डिपीआर) तयार करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.' अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी सोमवारी दिली.