...म्हणून पुणेकरांनी फडणवीसांसह माझ्यावर टीका केली - गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

...म्हणून पुणेकरांनी फडणवीसांसह माझ्यावर टीका केली - गडकरी

पुणे : आधीपासून पुण्याशी माझा जवळचा संबंध आहे. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विशेषतः पुण्याकडे, नागपूरकडे माझं लक्ष आहे. मी दोन्ही जिल्ह्यांना मदत करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही. नागपूरच्या मेट्रोचं काम पुढं गेलं. त्यावेळी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका झाली. पुण्यात मेट्रो भुयारी (pune metro) करायची, की वरून सुरू करायची यावर वाद होते. आग्रहाने निर्णय घेतला आणि मेट्रोच्या कामाची सुरुवात झाली. याचा मला आनंद आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) म्हणाले. आज पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा: राज्यसभा निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी भाजप तयार? पटोलेंनी दिलं उत्तर

...तर चंद्रकांत दादांना साडेतीन तासांत पुण्याहून कोल्हापूरला जाता येईल -

१ कोटी रुपये मेट्रोची किंमत आहे. पुणे-कोल्हापूर, सोलापूर, बारामती, लोणावळा येथे ब्रॉड गेज मेट्रो चालणार आहे. दोन बिझनेस क्लास विमानासारखे आहेत. विमानात हवाई सुंदरी असतात, तसेच येथेही असेल. त्याचं तिकीट एसटीच्या तिकीटीसारखं आहे. याचा वेग देखील १४० किलोमीटर आहे. त्यामुळे चंद्रकांत दादांना साडेतीन तासांत कोल्हापूरला जाता येईल, असेही गडकरी म्हणाले.

पुण्यात आल्यानंतर होतं दुःख -

पुण्यात येताना एका गोष्टीची दुःख होतं. माझी मोठी बहीण पुण्यात होती. आम्ही सुट्ट्यांमध्ये पुण्यात येत होतो. पर्वतीवर फिरायला जात होतो. तिथे मोकळी हवा घेत होतो. मात्र, आता ते मिळत नाही. आता पुण्यात खूप प्रदूषण झालं आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषणापासून मुक्त करावे. भारतातील सर्वात प्रदूषित शहरं आहेत. त्यात पुण्याचा वरचा क्रमांक आहे. पुण्याला प्रदूषणापासून अजित दादांनी मुक्ती द्यावी, असेही गडकरी म्हणाले.

पुणे ते बंगळुरू द्रुतगती महामार्ग -

सायरन आणि सलामी हा आकर्षणाचा विषय आहे. पण, सायरनचा आवाज कान फुटल्यासारखा येतो. जर्मन वायोलिन वादक होता. त्याला आकाशवाणीची एक ट्युन होती. ती ट्युन हॉर्नला लावण्याचे मी आदेश दिले आहे. पुण्यापासून बंगळुरूपर्यंत द्रूतगती महामार्ग बांधणार आहे. हा मार्ग फलटणवरून जाणार आहे. त्या महामार्गावर नवीन पुणे शहर तुम्ही वसवायचं. ते मेट्रो आणि रेल्वेने जोडायचं. पुण्यात वाहतूककोंडीची समस्या आहे. त्यामुळे आता मोठ्या शहराचं विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkari