esakal | पुणे प्रदुषणात अग्रेसर, अजित दादा तुम्ही प्रदुषणमुक्ती द्या - गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे प्रदुषणात अग्रेसर, अजित दादा तुम्ही प्रदुषणमुक्ती द्या - गडकरी

फ्लेक्स इंजिनच कंपन्यांना बनविले पाहिजे आणि असा आदेश काढणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं.

पुणे प्रदुषणात अग्रेसर, अजित दादा तुम्ही प्रदुषणमुक्ती द्या - गडकरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - पुण्यात सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन नितिन गडकरींच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी पुण्याला प्रदुषणातून मुक्ती द्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितलं. पुण्यात येताना एका गोष्टीचं वाईट वाटायचं. मोठी बहीण पुण्यात असताना सुट्टीला आम्ही इकडे यायचो. पर्वतीवर फिरायला जात होतो तेव्हा मोकळी हवा मिळायची पण आता मिळत नाही. पुण्यात मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झालं असल्याचं गडकरी म्हणाले.

गडकरींनी सांगितलं की, पुणे देशातील सर्वात प्रदुषित शहरांमध्ये अग्रेसर आहे. पुण्याला जलप्रदूष आणि वायुप्रदुषणापासून मुक्त करावं. पुण्याला प्रदुषणापासून अजित दादांनी मुक्ती द्यावी. मला पेट्रोल डिझेल बंद करायचं आहे आणि त्यासाठी इथेनॉलचा वापर झाला पाहिजे. ब्राझिल मध्ये १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत.

इथेनॉलचा ६५ रुपये लिटर दर आहे. रशियातून हे तंत्रज्ञान आणले आहे. सध्या तीन पंप पुण्यात सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पंप सुरू करा. साखर कारखान्याची स्थिती सुधारेल. महाग पेट्रोल घ्यावे लागणार आहे. पुण्यात प्रदुषण मुक्ती झाली पाहिजे. यासाठी इथेनॉलचा वापर झाला पाहिजे. फ्लेक्स इंजिनच कंपन्यांना बनविले पाहिजे आणि असा आदेश काढणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं.

हेही वाचा: 'नवी मेट्रो शोधलीय, चंद्रकांत दादा तुम्ही साडेतीन तासात कोल्हापूरला जाल'

पुण्याच्या रिंग रोडबाबतही गडकरींनी आश्वासन दिले असून एक अटही घातली आहे. रिंगरोडसाठी तुम्ही भूसंपादन करा मी बांधतो असं गडकरी म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं की, पुण्यापासून बंगलोर ४० हजार कोटींचा द्रुतगती मार्ग बांधणार आहे. या रस्त्यावर नवीन पुणे बसवा आणि जागा आपण घेऊ. मेट्रोने शहर जोडू. मोठ्या शहराचे विकेंद्रीकरण करा, खूप दाटीवाटी झालीय यावर विचार करा.

loading image
go to top