esakal | ‘आपण काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करू’; नितीन गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

‘आपण काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करू’; नितीन गडकरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. ‘आपण कोणतीही काळजी करू नका, आपल्याला लागणारी सर्वतोपरी मदत आम्ही करू’ असे गडकरी यांनी त्यांना आश्वस्त केले.

अशोकराव काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना यकृताचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार ते ससून रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रत्यारोपणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गडकरी यांनी आज पुण्यात आल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे अशोकराव यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यकृत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती रासने यांनी दिली. तेव्हा गडकरींनी त्यांना फोन लावून देण्यास सांगितले. त्यांनी गोडसे यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच, ससूनमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश तातिया यांच्याशीही चर्चा करून माहिती घेतली. शिस्तबद्ध, विकासकामांची दूरदृष्टी असलेल्या गडकरी यांनी पुन्हा कार्यकर्त्यांच्या प्रती असलेली आत्मीयता आणि संवेदनशीलतेची प्रचिती दिली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन उपाध्यक्ष विकास काकतकर यांची दिल्ली भेटीदरम्यान प्रकृती अस्वस्थ झाली होती. त्यावेळी गडकरी यांनी जातीने लक्ष देऊन उपचार करवून घेतले होते. तसेच, त्यांच्या स्वीय सहायकावर गंभीर आजारावर चेन्नईत उपचार करण्यासाठी अशक्यप्राय वाटणारी यंत्रणा उभी केली होती. या घटनेमुळे संवेदनशील आणि हळव्या मनाच्या गडकरींच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.

loading image
go to top