Pune Crime : नितीन म्हस्के खूनप्रकरणी मुख्य आरोपीसह १६ आरोपींना अटक, एक अल्पवयीन ताब्यात

मंगला चित्रपटगृहाजवळ नितीन मोहन म्हस्के याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपी सागर ऊर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी याच्यासह १६ संशयित आरोपींना अटक केली.
Pune Police
Pune Policesakal
Updated on

पुणे - मंगला चित्रपटगृहाजवळ नितीन मोहन म्हस्के याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपी सागर ऊर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी याच्यासह १६ संशयित आरोपींना अटक केली. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या सहा पथकांनी ४८ तासांत पुण्यासह सोलापूर, लातूर, कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव परिसरात ही कारवाई केली.

नितीन म्हस्के (वय ३५, रा. ताडीवाला रस्ता) हा मित्रांसमवेत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चित्रपटगृहाबाहेर यल्ल्याच्या टोळीने नितीनवर तलवारी आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. याबाबत नितीनचा मित्र सतीश वानखेडे याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सागर ऊर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी (वय ३५), सुशील अच्युतराव सूर्यवंशी (वय २७), शशांक ऊर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय २१), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (वय २८), मल्लेश ऊर्फ मल्ल्या शिवराज कोळी (वय २४), किशोर संभाजी पात्रे (वय २०), गणेश शिवाजी चौधरी (वय २४, रा. कुंजीरवाडी), मनोज ऊर्फ बाबा विकास हावळे (वय २३), विकी ऊर्फ नेप्या काशिनाथ कांबळे (वय २२, रा. सर्वजण ताडीवाला रोड), साहिल ऊर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय २०), रोहित बालाजी बंडगर (वय २०), लॉरेन्स राजू पिल्ले (वय ३६), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय २३), विवेक ऊर्फ भोला भोलेनाथ नवघरे (वय २५, रा. रामवाडी), इम्रान हमीद शेख (वय ३१, रा. केशवनगर), आकाश ऊर्फ चड्डी सुनील गायकवाड (वय २२, रा. उत्तमनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-एकचे पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, खंडणी विरोधी पथक-एकचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, वाहन चोरी पथक-एकचे पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर आणि युनिट दोनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com