

पुणे - मुंबई महापालिकेला होर्डिंगमधून मिळणारे शुल्क हे पुणे महापालिकेच्या १० पट जास्त आहे. सध्याचे पुणे महापालिकेचे उत्पन्न हे खूप कमी आहे. त्यामुळे नवीन शुल्क निश्चिती करताना किमान ७०० ते ७५० रुपये प्रति चौरस फूट असण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याचे संकेत दिले असून, उत्पन्न वाढीसाठी शुल्क कमी करण्यासंदर्भात तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.