मुख्यमंत्र्यांनी सांगूनही पुण्यात गुन्हा नाहीच

No crime has been registered for the illegal hoarding in pune
No crime has been registered for the illegal hoarding in pune

पुणे -  महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे फ्लेक्‍स लावण्यावरून मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर महापालिका प्रशासनाने दोन दिवसांत शहरातील ४ हजार ४०० फ्लेक्‍स, बॅनर, पोस्टर, झेंडे काढून टाकले. मात्र, बेकायदा होर्डिंग लावल्याप्रकरणी अद्याप एकही गुन्हा दाखल केलेला नाही.

महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी आणि रविवारी पुण्यात होते. ते ज्या मार्गावरून जाणार होते तेथे भाजपचे आमदार, विधानसभेसाठीच्या इच्छुक उमेदवारांनी, नगरसेवकांनी बेकायदा फ्लेक्‍स लावले होते. यामुळे रस्ते, पादचारी मार्ग, दुभाजक सर्व काही फ्लेक्‍स, बॅनर, पोस्टर, बोर्ड, झेंड्यांनी व्यापून गेले होते.

याविरोधात पुणेकरांनी टीकेची झोड उठवलीच; शिवाय भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत पदाधिकाऱ्यांचे कान टोचले होते. महापालिकेच्या आकाशचिन्ह व अतिक्रमण विभागाने रविवारी (ता. १५) दुपारी सुरू केलेली कारवाई सोमवारी संध्याकाळनंतरही सुरूच होती. हडपसर, स्वारगेट, लष्कर, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, कोथरूड, डेक्कन, शिवाजीनगर, येरवडा, मंगळवार पेठ, चंदननगर, वडगाव बुद्रुक या भागांतून रविवारी दीड हजार तर सोमवारी अडीच हजारांपेक्षा जास्त फ्लेक्‍स, पोस्टर, बोर्ड, बॅनरवर कारवाई केली.

अतिरिक्त आयुक्तांकडे माहितीच नाही
शहरातील किती बेकायदा फ्लेक्‍स, होर्डिंग काढून टाकले व किती गुन्हे दाखल केले, याबद्दल अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांना विचारले असता आम्ही सुटीच्या दिवशीही काम केले आहे, असे सांगितले. पण, नेमके शहरात किती फ्लेक्‍स काढले व किती गुन्हे दाखल केले, हे त्यांना सांगता आले नाही. दरम्यान, ही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असूनही त्यांनी ती घेतली नसल्याचे समोर आले. 

अशी केली कारवाई 
फ्लेक्‍स  ५६२
बॅनर     ७५५
झेंडे     ७०६
बोर्ड    १४८१
पोस्टर   ७७० 
इतर    १५९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com