
पुणे : ‘निवृत्तिवेतनधारकांचेही शहर’ अशी ओळख असलेल्या पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर आहे. उतारवयात खरी गरज असलेली सशक्त आरोग्यसेवा ज्येष्ठांना देण्यासाठी महापालिकेचे आरोग्यविषयक ठोस धोरण नाही. मुळात महापालिकेचा स्वतंत्र दवाखाना नाही किंवा आहे त्या दवाखान्यांतही स्वतंत्र सुविधा नसल्याने ज्येष्ठांची आरोग्यसेवा वाऱ्यावर आहे.