रोजगार मिळत नाही, मात्र पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water tanker

रोजगार मिळत नाही, मात्र पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात

उंड्री : कोरोना महामारीचे संकट संपले असले तरी अद्याप दररोज रोजगार मिळत नाही.मात्र, पाण्यासाठी न चुकता पैसे मोजावे लागत आहेत. प्रशासनाने किमान पाणी तरी द्यावे,अशी आर्जवी विनंती उंड्री चौकातील तीनशे-साडेतीनशे मजुरांनी केली.

लातूर, बार्शी, पंढरपूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड, तसेच परराज्यातील झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशातील कष्टकरी कामगार उंड्री, पिसोळी, महंमदवाडी परिसरात स्थायिक झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगारासाठी गाव सोडलं, शहर गाठल. मात्र, इथेही आमच्या नशिबी उन्हाची काहिली आणि पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. रोजगार मिळेल आणि मुलांना चांगले शिक्षण देता येईल, यासाठी शहराकडे आलो. पैपै जमवला, सोनंनाणं मोडल आणि घर घेतले. दररोज रोजगार मिळत नाही, मात्र, पाण्यासाठी दररोज पैसे मोजावे लागत आहेत, अशी व्यथा कष्टकऱ्यांनी मांडली.

मागिल दोन वर्षे कोरोनामुळे त्रस्त झालो होते. यावर्षी रोजगार नाही आणि कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त झालो आहोत. पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळावे,एवढीच माफक अपेक्षा आहे.

- ज्ञानेश्वर कांबळे, महंदवाडी, बबन मोहिते, होलेवस्ती

पाणी मिळत नसल्यामुळे सोसायटीमध्ये घर घेतल्याचा पश्चाताप होत आहे. सोसायटीच्या देखभाल दुरुस्तीबरोबर आता पाण्याचा खर्च वाढला आहे. पाणी मिळत नसेल, तर पालिकेला कर कशासाठी भरायचा.

- जयश्री गणेश, उंड्री

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त म्हणाले की, उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुख्य खात्यातील पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: No Employment But Pay For Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..