पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. उत्सव शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगार, जामिनावर बाहेर आलेले आरोपी, तसेच तडीपार गुन्हेगारांवर नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन्सच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात येणार आहे.