""आरटीई'साठी शुल्क घेऊ नका'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

पुणे: पुणे व पिंपरी- चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांनी "आरटीई'अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क घेऊ नये आणि घेतले असेल तर ते पालकांना परत करावे, असा आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी दिला. 

पुणे शहरातील काही नामवंत शाळांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क घेतल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हा आदेश देण्यात आला. या आदेशाच्या प्रति सर्व शाळांना देण्याचेही पुणे व पिंपरी- चिंचवड पालिकेचा शिक्षण विभाग आणि सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना आदेशाद्वारे सांगण्यात आले. पालकांनीही कोणतेही शुल्क देऊ नये, असे आवाहन कुऱ्हाडे यांनी केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No fees for students under RTE admission