पुणे - 'बीडमधील संतोष देशमुख खुन प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी), राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) व न्यायालयीन चौकशी समिती अशा तीन पातळ्यांवरील तपास संस्थांकडुन बारकाईने तपास सुरु आहे. त्यांच्या चौकशीतुन कोण दोषी आहे हे सिद्ध होईल, त्याला कडक शिक्षा केली जाईल.