अन्‌.. आठवड्यात नवा रुग्ण नाही;झोपडपट्टीतील उद्रेक रोखण्यात यश 

उमेश शेळके, सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 30 मे 2020

पाटील इस्टेट झोपडपट्टीत राबविण्यात आल्या.त्यामुळे कोरोनाचा उद्रेक बनलेली ही झोपडपट्टी आज मोकळा श्‍वास घेऊ लागली आहे.गेल्या आठ दिवसांमध्ये एकही नवारुग्ण झोपडपट्टीत आढळलेला नाही

पुणे - बॅरिकेटींग...घरटी जीवनावश्‍यक वस्तूंचे किट.... सर्व्हेक्षणात लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी आणि क्वॉरंटाईन.... सार्वजनिक स्वछ्तागृहात सेन्सर असलेले नळ.. जागोजागी हात धुण्यासाठी साबण आणि वॉशबेसिन, अशा अनेक उपाययोजना पाटील इस्टेट झोपडपट्टीत राबविण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक बनलेली ही झोपडपट्टी आज मोकळा श्‍वास घेऊ लागली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण झोपडपट्टीत आढळलेला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शिवाजीनगर येथे पुण्यातील सर्वात मोठी ही झोपडपट्टी हे. सुमारे सव्वा दोन एकरवर पसरली असून बाराशे ते तेराशे झोपड्या आहेत. अतिशय दाटीवाटीची आणि एकाच झोपडीत किमान आठ ते दहाजण राहतात. त्यामुळे एखादा पॉझिटिव्ह रुग्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील किमान चार ते पाच जणांना संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणे आढळून आली. त्यामुळे या झोपडपट्टीत गेल्या ५८ दिवसांत कोरोनाने धुमाकूळ घातला होता. तब्बल १७२ रुग्ण आढळले होते. दिवसागणिक ही संख्या वाढतच होती. परंतु उपायुक्त नितीन उदास यांनी राबविलेल्या उपाययोजनांमुळे आठ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. या उलट जनवाडी, गोखलेनगर, रामोशीवाडी , पांडवनगर झोपडपट्ट्यांमध्येही कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये राबविलेल्या उपाययोजनाबद्दल उदास म्हणाले,"" झोपडपट्टीत रुग्ण आढळल्यानंतर तातडीने तेथील गल्लीबोळ बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली. दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून तातडीने तपासणी सुरू करण्यात आली. विशेषत: साठ वर्षांवरील आणि अन्य आजारी गरिकांच्या तपासणीला प्राधान्य देण्यात आले. लक्षण आढळल्यास तातडीने संस्थात्मक क्वॉरंटाईन करून उपचार सुरू करण्यात आले. जागोजागी तात्पुरते वॉशबेसिन आणि हात धुण्यासाठी सॅनिटायझर व साबणाची सुविधा देण्यात आली. अशा अनेक छोट्या मोठ्या उपाययोजनांमुळे पाटील इस्टेस्ट झोपडपट्‌टीतील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यास मदत झाली.'' 

पाटील इस्टेटमधील उपाययोजना 
-सार्वजनिक स्व्छ्टगृहांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता 
-स्व्छ्तागृहांत सेन्सर असलेले नळ बसविले 
-त्याठिकाणी हॅडवॉशची सुविधा केली. 
- मुख्य रस्त्यांवर तात्पुरते वॉशबेसिनची व्यवस्था 
-वस्तीमध्ये दिवसातून दोनदा फवारणी 
-स्थानिक कार्यकर्ते आणि डॉक्‍टरांची मदत 
-झोपडीधारकांना घरपोच जीवनावश्‍यक वस्तूंचे किट 
-वस्तीमध्ये रुग्ण्वाहिकेच्या माध्यमातून जागेवर तपासणी आणि नमुने घेतले. 

उद्रेकाची नवी ठिकाणे  
कामगार पुतळा, सर्व्हेनंबर 11, संगमवाडी, महात्मा गांधी वसाहत, रामोशीवाडी, जनवाडी, पांडवनगर, वडारवाडी या भागात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. या सर्व भागात मिळून सुमारे १९५ 
पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय उपयोजना सुरू आहेत  
नव्याने वाढलेल्या उद्रेकांच्या ठिकाणी आता महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी या वस्त्यांमधील डॉक्‍टरांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना सर्व पीपीई किटपासून सर्व साधने आणि औषधे देण्यात आली आहे. तसेच रुग्ण्वाहिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणीचे काम सुरू आहे. बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. विशेषतः: साठ वर्षावरील नागरिकांची प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे. 

अन्य ठिकाणी काय उपयोजना  
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये साठ वर्षांवरील नागरिक, तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहचा त्रास असलेल्या नागरिकांच्या तपासणीला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी नागरिकांच्या याद्या तयार केल्या आहेत. जागेवर जाऊन तपासणी करण्यासाठी रुग्ण्वाहिका सुविधा देण्यात आली आहे. लक्षणे आढळताच त्यांना क्वॉरंटाईन करून उपचार सुरू करण्यात येत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No new patients found in slums in eight days;success preventing slum outbreaks