ब्रिजभूषण सिंह यांना कोणी मॅनेज करू शकत नाही - शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
ब्रिजभूषण सिंह यांना कोणी मॅनेज करू शकत नाही - शरद पवार

ब्रिजभूषण सिंह यांना कोणी मॅनेज करू शकत नाही - शरद पवार

खडकवासला - ब्रिजभूषण सिंह दिल्लीत असतात. ते संसदेचे सदस्य आहेत. तर मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा गेली तीस वर्षे अध्यक्ष आहे. आम्हाला तिथे लक्ष द्यायला वेळ नाही. ब्रिजभूषण कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय पातळीवर काम पाहतात. त्यांची काही मतं आहेत. त्यांची विचारधारा आहे. पण ती आम्ही कधी खेळात आणत नाही. त्यांनी मांडलेली मते ही वैयक्तिक होती. त्यांना मॅनेज केलं हे तुम्ही डोक्यातून काढा. ब्रिजभूषण सिंह यांना कोणी मॅनेज करू शकत नाही. अशी ती व्यक्ती आहे. अशी सविस्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हि माहित दिली.

महाराष्ट्र कनेक्ट काँक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची मुलाखत ज्ञानेश महाराव यांनी आज शनिवारी पुण्यात मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविक आमदार रोहित पवार यांनी केले. कन्हैया कुमार, प्रवीण गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.

ईडी, आयकर विभाग यातपास यंत्रणांचा वापर चुकीचा होत आहे. केंद्रातील सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत. अशा संकटांना धाडसाने तोंड दिले पाहिजे. शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना जनता प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष राहण्याचा सल्ला देत पवार म्हणाले,.शिवसेनेमुळे भाजप महाराष्ट्रात वाढली असे म्हणता येणार नाही. संघाचे लोक एका विचाराने काम करत होते. महाराष्ट्रात झालेल्या चकवळींशी त्यांनी स्वतःला जोडुन घेतलं आणि पाळंमुळं पसरवली. गणपती दूध पितो असो वा विशिष्ट आंबा खाल्याने मुल होतं या सगळ्या खुळचट गोष्टी आहे. तरुण पिढी त्याला थारा देत नाही.

खासदार संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघे अनेक वेळा एकाच व्यासपीठावर आलेले आहेत. अशा प्रकारचे आघाडीचे सरकार यावे. असे बाळासाहेबांचे स्वप्न होते. राज्याने देशाचे नेतृत्व करावे असे आम्हाला वाटते. पवार यांनी पुढाकार घेतल्या शिवाय ते होणार नाही. पुढील निवडणुकीत देखील भाजपने विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवावी. भाजपची वृत्तीचा मी फार मोठा अभ्यासक आहे. त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. म्हणून शिवसेना महाराष्ट्रात वेगळी भूमिका घेऊ शकते. इतर प्रमुख पक्ष सोबत घेऊन राज्याला वेगळी दिशा आणि नेतृत्व देऊ शकते हि संधी आली. तेव्हा सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत हा महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे शेवट पर्यत तरून होते. आज देखील शरद पवार विचाराने तरून आहेत. हे दोघे हि लोकांशि कनेक्ट होते.

बाळासाहेबानी काय केले असते… याने उत्तर सापडते

बाळासाहेब ठाकरे यांची कधी आठवण येते याला उत्तर देताना शरद पवार म्हणले ‘राजकीय क्रायशेस असतो. त्यावेली बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते. हा विचार डोक्यात येतो. आणि क्रायशेस उत्तर सापडते. तर आमदार रोहित पवार नामदार कधी होणार, या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘मी १९६७ साली विधिमंडळात गेलो होतो. मला नामदार व्हायला 5 वर्षे थांबावे लागले होते.’ पुरोगामी महाराष्ट्र असताना विधवाची बंधने काढण्यास उशीर झाला पण… त्याची सुरवात झाली. हे देखील महत्वाचे आहे. ते सर्व राज्यभर पोचले आहे. विधवानी बंधने पाळू नका. याबाबत जनजागृती करणाऱ्या अनेक मुली, महिला संच वाढत असल्याचे निष्कर्ष नोंदविले.

Web Title: No One Can Manage Brij Bhushan Singh Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sharad Pawarpune
go to top