
पुणे : पुणे विमानतळावर ‘पार्किंग बे’ वेळेवर उपलब्ध न झाल्याने सुमारे २०० प्रवाशांना तासभर विमानातच बसून राहावे लागले. तासाभराने प्रवासी विमानातून बाहेर पडले. मात्र, पुढे इमिग्रेशन व बॅग घेण्यासाठी प्रवाशांना दीड तास उशीर झाला. दुबई ते पुणे विमान प्रवासासाठी साधारण तीन तास लागतात. तेवढाच वेळ प्रवाशांना पुणे विमानतळाच्या बाहेर येण्यासाठी लागला. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली.