murlidhar mohol
पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक आरोप- प्रत्यारोपांवर जाणार नाही, असे वाटले होते. पण त्यांनी आरोप केल्याने ते सुरु झाले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी नुराकुस्ती खेळत नाही. मी इतरांसारखा आक्रमक बोललो नसलो तरी शांततेत क्रांती करतो. निवडणुकीनंतर अन्य कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, अशा शब्दात विरोधकांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले.