#HospitalIssue ‘सीझर करावे लागेल; दुसऱ्या रुग्णालयात हलवा’

प्रणिता मारणे 
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

एरंडवणे - कोथरूडमधील महापालिकेच्या सुतार रुग्णालयात सीझर करण्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सीझरची वेळ आल्यास संबंधित रुग्णांना ससून किंवा महापालिकेच्या इतर रुग्णालयांत हलविले जाते. मात्र या दरम्यान संबंधित रुग्णाचा जीव जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

एरंडवणे - कोथरूडमधील महापालिकेच्या सुतार रुग्णालयात सीझर करण्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सीझरची वेळ आल्यास संबंधित रुग्णांना ससून किंवा महापालिकेच्या इतर रुग्णालयांत हलविले जाते. मात्र या दरम्यान संबंधित रुग्णाचा जीव जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कै. जयाबाई नानासाहेब सुतार रुग्णालयात कोथरूडबरोबरच वारजे, मुळशी येथून दररोज साठ ते सत्तर महिला उपचारासाठी येतात. येथे तीन वैद्यकीय तज्ज्ञ व २५ परिचारिका काम करतात. मात्र येथे सीझरची सुविधा नसल्याने नॉर्मल प्रसूती केल्या जातात. मात्र त्याचवेळी सीझर करण्याची वेळ आल्यास संबंधित रुग्णाला ससून किंवा महापालिकेच्या दुसऱ्या रुग्णालयात पाठविले जाते. यामध्ये फार वेळ गेल्यास किंवा अन्य अडचणी आल्यास संबंधित रुग्णाचा जीव जाण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

याबाबत येथील रहिवासी रोहिणी शिंदे म्हणाल्या, ‘‘गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यापासून मी सुतार रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत आहे. माझ्यावर योग्य उपचार केले जात आहेत. त्यासाठी येथील डॉक्‍टर आणि परिचारिका सहकार्य करतात. मात्र येथे सीझरची वेळ आल्यास ऐनवेळी धावपळ होते. जर या रुग्णालयात ती सुविधा उपलब्ध झाली तर आम्ही निश्‍चिंत राहू.’’

सुतार रुग्णालयामध्ये येणारा प्रत्येक रुग्ण बरा होऊन अन्‌ समाधानानेच बाहेर जाईल, याची आम्ही काळजी घेतो, किंबहुना तोच आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेची प्रसूती नॉर्मल होण्याकडे आमचा कल असतो. मात्र जर सीझर करायची वेळ आली तर संबंधित रुग्णाला ससून हॉस्पिटलमध्ये हलवावे लागते.
- डॉ. मेघा रॉय,  वैद्यकीय अधिकारी, सुतार रुग्णालय 

 

    दररोज ७० महिलांवर उपचार
    तीन वैद्यकीय तज्ज्ञ
    २५ परिचारिका
    नॉर्मल प्रसूतीचीच सुविधा

Web Title: no required facilities in a sutar hospital in Kothrud